मूळ विषयाला बगल देण्यासाठीच समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर चिखलफेक - किरीट सोमैया - किरीट सोमैया मुंबई
मुंबई - अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्ती यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून छापासत्र सुरू आहे. हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर चिखलफेक सुरू आहे. क्रांती रेडकर आणि तिच्या कुटुंबीयांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि समस्त महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी त्यांची माफी देखील मागितली आहे. अजित पवार प्रकरणात आता ईडी देखील चौकशी सुरू करणार आहे. सोमवारी लातूर नांदेड येथील शेतकऱ्यांना घेऊन ईडी कार्यालयात पुरावे सादर करणार, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते किरीट सोमैया यांनी दिली आहे.