शेवटच्या श्रावण सोमवारी फुलांनी सजला विठ्ठल-रुक्मिणीचा गाभारा - विठ्ठल-रुक्मिणी
यंदा श्रावण महिना 9 ऑगस्ट रोजी सुरू झाला. यंदा श्रावण महिन्यात 5 सोमवार आले आहेत. यातील पाचवा आणि शेवटचा सोमवार 6 सप्टेंबर म्हणजे आज आहे. हा श्रावणातील शेवटचा दिवस देखील आहे. या निमित्ताने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणीचा गाभारा सुंदर फुलांनी सजवला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला 1500 टन फुलांचा वापर करून आकर्षक आरास करण्यात आली.