सत्यपाल महाराजांच्या शिष्याने केली किर्तनातून जनजागृती
अमरावती - जगात सध्या कोरोनाने थैमान घातला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन केले आहे. पण, काही लोक विनाकारण घराबाहेर पडतात. यामुळे त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना त्याचबरोबर पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होऊ शकतो. म्हणुन पवन दवंडे यांनी किर्तनातून ही जनजागृती केली.