संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट - पुणे शहर बातमी
आळंदी (पुणे) - संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात शनिवारी (दि. 7 ऑगस्ट) पहाटे समाधीवर दुग्धअभिषेक करत महाआरती करण्यात आली. विना मंडपात व समाधी मंदिरात (गाभाऱ्यात) विविध रंगाच्या फुलमाळांनी सजविण्यात आली होती. समाधी मंदिरातील दृश्य अत्यंत विलोभनीय होते. प्रत्येक विशेष दिनानिमित्ताने माऊलींच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट केली जाते.