शिखर दर्शन झालं, पोहचली वारी...जातो माघारी बा विठ्ठला!
राज्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो किलोमीटरचं अंतर पार करून सर्वच संतांच्या दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्यात. पंढरीत आलेल्या प्रत्येकाला विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन मिळतंच असं नाही. पण आपला दिंडीतला सहभाग हेच विठ्ठलाचं दर्शन असं मानणारा समाधानी वारकरी संप्रदाय आज पाहायला मिळाला. कारण, वारीत सहभागी होणं म्हणजेच विठ्ठलाला भेटणं असतं.