'अण्णांनी दलित उपेक्षितांचे जीणं जगाच्या पटलावर नेलं' - annabhau sathe 100 th birth anniversary
ठाणे - अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यातील फार मोठी पोकळी भरुन काढली. त्यांनी क्रांतिकारक विचार दिला आणि त्यांच्यामुळेच जगाला दलित साहित्याची दखल घ्यावी लागली. अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या साहित्यातून आजपर्यंत जो समाज साहित्याच्या परिघावर नव्हता अशा समाजाला नायकत्व दिले. त्यांनी जो मजूर, कामगार, कष्टकरी, भटका समाज पाहिला अशा सामान्य रस्त्यावर राहाणारा, झोपडीत राहाणाऱ्या, शोषित, पिळला गेलेल्या सामान्य माणसाला नायक केले. त्यांना सन्मान दिला. त्यांचे दुःख, वेदना अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यातून मांडल्या, असे मत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे माजी सरचिटणीस कॉम्रेड सुबोध मोरे यांनी व्यक्त केले. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने 'जग बदल घालुनी घाव' या विशेष मालिकेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे माजी सरचिटणीस कॉम्रेड सुबोध मोरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी कॉम्रेड मोरे यांनी अण्णाभाऊ आणि आंबेडकरवाद यावर प्रकाश टाकला आहे.. पाहुयात, ते काय म्हणाले.