महापुरात अडकून जनावरेही भुकेने व्याकूळ; पशु आहार आणि औषधे पाठविण्याचे काम सुरू - NDRF Team
कोल्हापुरातील आंबेवाडी आणि चिखली या दोन गावामध्ये महापुरात अडकलेल्या हजारो लोकांना बाहेर काढण्याचे काम गेल्या ५ दिवसांपासून सुरू आहे. तर अनेक जनावरेही या पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. त्यामुळे या प्राण्यांनासुद्धा आता आहाराची गरज आहे. दरम्यान, या प्राण्यांसाठी पशु आहार आणि औषधे पाठविण्याचे काम सुरू आहे.