तपास संस्थांच्या चौकशीनंतर योग्य ती कारवाई राज्यशासन करेल - गृहमंत्री अनिल देशमुख - mukesh ambani case
नागपूर - राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेले अंबानी यांच्या घरासमोर मिळालेले स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात चौकशी NIA तसेच ATS करत आहे. तपास संस्थांच्या चौकशीनंतर राज्यशासन आणि केंद्र शासन योग्य ती कारवाई करेल, असे म्हणत गृहमंत्री अनिल देखमुख यांनी इतर प्रश्नांची उत्तरे देणे टाळले.