VIDEO : अंतर्गत भांडणातून तरुणाला बळजबरी खाऊ घातला कचरा, व्हिडिओ व्हायरल - young man to eat garbage
मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरामध्ये अंतर्गत भांडणामुळे एका तरुणाला दोन तरुण कचरा खाऊ घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यासंदर्भात मेघवाडी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर एक आरोपी सध्या फरार आहे.