मुंबईत ऑक्सिजन सिलेंडर व किट बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या आरोपीला अटक - mumbai live update
मुंबई - कोरोनाच्या संकटकाळादरम्यान बेकायदेशीररित्या मेडिकल ऑक्सिजन सिलिंडर व ऑक्सिजन किट विक्री करणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिटने अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट 9 चे पोलीस निरीक्षक सुधीर जाधव यांना बेकायदेशीररित्या मेडिकल ऑक्सिजन सिलेंडरचा साठा करून ठेवण्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी जोगेश्वरी ऑल इंडिया हेल्थ केअर या गोडाऊनमध्ये छापा टाकून पाहणी केली. यावेळी त्यांना 25 सिलेंडर व 12 ऑक्सिजन किट सापडल्या. हे सर्व सिलिंडर त्याने मिरा-भाईंदर येथून बेकायदेशीररित्या आणले होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना देखील यांची विक्री केली जात होती. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून अशाप्रकारे अवैधरित्या कुठे कुठे विक्री केली आहे, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.