VIDEO : चांगल्या आरोग्यासाठी भाविक टाकतात एक किलोमीटर लोटांगण; 903 वर्षापासूनची प्रथा - good health
अमरावती - जगभरात मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीचे संकट घोंगावत आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील बालाजी संस्थानच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात येते या यात्रेमध्ये भाविक सुदृढ आरोग्यसाठी 903 वर्षाची परंपरा जपत तब्बल एक किलोमीटर पर्यंत लोटांगण घालत जातात. अचलपूर येथील बालाजी मंदिरापासून भाविक लोटांगण घालतात यातील अनेक भाविक देवाला विनवणी करत आपले नवस पूर्ण करतात मंदिरातून लोटांगण घालणाऱ्या भाविकांवर वैदिक पद्धतीने नारळ देऊन लोटांगण याची सुरुवात होते. 903 वर्षापासून सुरू असलेली परंपरा आजही येथील युवक मोठ्या उत्साहाने जपत आहेत श्रद्धा सोबतच सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारी ही यात्रा बघण्यासाठी संपूर्ण विदर्भातून भाविक येत असतात.