महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बीडमध्ये 500 आरोग्या कर्मचाऱ्यांना मिळाली कोरोना लस - Beed Corona Vaccination News

By

Published : Jan 16, 2021, 11:09 AM IST

Updated : Jan 16, 2021, 11:49 AM IST

बीड - कोविड काळात अग्रस्थानी काम केलेल्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना शनिवारी कोरोना लस टोचण्यात आली. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण उपक्रमाला सकाळी 10 वाजता प्रारंभ झाला. बीड जिल्ह्यात एकूण 500 डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना 5 केंद्रावरून कोरोना लसीकरण झाले. या पाच केंद्रामध्ये बीड जिल्हा रुग्णालयसह गेवराई, आष्टी, अंबाजोगाई व परळी तालुक्याचा समावेश आहे. लसीकरण दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली होती अत्यंत उत्साहाच्या वातावरणात लसीकरण मोहिमेला बीड जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. अख्तर मुबारक शेख या आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली लस टोचण्यात आली.
Last Updated : Jan 16, 2021, 11:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details