19 वी ऊस परिषद : एकूण एफआरपीच्या 14 टक्के वाढ शेतकऱ्यांनाही द्या; राजू शेट्टींची मागणी - शेतकरी संघटना आंदोलन
कोल्हापूर - ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू वर्षी पहिली उचल विनाकपात एक-रकमी देण्यात यावी. तसेच तोडणी वाहतुकीमध्ये ज्याप्रमाणे 14 टक्क्यांनी वाढ करण्यात आले आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वाढलेला उत्पादन खर्च गृहीत धरून एकूण एफआरपीच्या 14 टक्के वाढ हंगाम संपल्यानंतर देण्यात यावी. अन्यथा साखर अडवून वाढीव रक्कम वसूल करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.