पी. व्ही. सिंधूने सपना चौधरीच्या गाण्यासह बॉलीवूड साँगवर धरला ठेका, पाहा व्हिडिओ - Sapna Choudhary
मुंबई - भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू आणि टोकियो ऑलिम्पिकमधील कास्य पदक विजेती खेळाडू पी. व्ही. सिंधूचा एक व्हिडिओ सद्या तुफान व्हायरल होत आहे. सिंधू यात तुफान डान्स करताना पाहायला मिळत आहे. घडलं असे की, सिंधू सुचित्रा बॅडमिंटन अकादमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला पोहोचली होती. सिंधूने या पार्टीत आपल्या सहकाऱ्यांसोबत डान्स केला. सिंधू हरयाणाची प्रसिद्ध डान्सर सपन चौधरीच्या 'तेरी आंख्या का यो काजल' या गाण्यावर तसेच बॉलिवूड गाण्यांसह दक्षिणात्य गाण्यांवर ठेका धरला. (व्हिडिओ साभार - suchitra badminton official instagram)