पाहा, निक्की ताबोळी, हिना खान झाल्या कॅमेऱ्यात कैद - बॉलिवूड सेलेब्स स्पॉटेड
बॉलिवूड सेलेब्रिटी मायानगरी मुंबईत नेहमीच हौशी फोटोग्राफर्सना फोटोसाठी पोज देतात. दिशा परमारने अंधेरीमध्ये मिकी माऊस प्रिंट केलेला लूज शर्ट आणि ब्लॅक ट्राउझर्ससह फोटोसाठी पोज दिली. निकीता रावल हिला लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये टिपण्यात आले. बिग बॉस फेम निक्की तांबोळी पारंपारिक पोशाखात मुंबई विमानतळावर उतरली. वडिलांचा अंतिम संस्कार करण्यासाठी हिना खान मुंबईत दाखल झाली. हृदयविकाराच्या घटनेनंतर २० एप्रिल रोजी हिनाच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.