पंतग महोत्सवात सहभागी झाले वरुण - श्रद्धा, 'स्टीट डान्सर'चं केलं प्रमोशन - street dancer promotion
अहमदाबाद - बॉलिवूड अभिनेता वरुण धवण आणि श्रद्धा कपूर यांचा 'स्ट्रीट डान्सर' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या या चित्रपटाची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलिकडेच या टीमने अहमदाबाद येथे झालेल्या पतंग महोत्सवात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला, तसेच 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटाचं प्रमोशनही केलं. यावेळी वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत नोरा फतेहीची देखील उपस्थिती होती.