सुशांतच्या मृत्यू आत्महत्या नाही खुनच, चाहत्यांचा दावा - सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण
सुशांतच्या मृत्यूनंतर एम्सने दिलेल्या अहवालात ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. मात्र सीबीआयने अद्यापही याबाबतचा निर्णय गुलदस्त्यातच ठेवलाय. आज त्याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याचे स्मरण केले. त्याच्या मित्रांनी हा मर्डर असल्याचे सांगत यासाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले. सुशांतचा जिम पार्टनर सुनील शुक्ला यांनी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असल्याचे स्पष्ट केले.