Birthday Special : रागीट प्रियकर ते परफेक्ट पती, 'या' आहेत शाहिदच्या खास भूमिका - शाहिद कपूरच्या भूमिका
मुंबई - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरचा आज ३९ वा वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने आजवर बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. मागच्या वर्षी त्याचा 'कबिर सिंग' हा चित्रपट बराच गाजला. वेगवेगळ्या कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत होता. या चित्रपटात त्याने रागीट प्रियकराची भूमिका साकारली होती. मात्र, शाहिदचे इतर चित्रपटही त्याच्या भूमिकांमुळे गाजले आहेत. यामध्ये 'इश्क विश्क', 'विवाह', 'हैदर', 'उडता पंजाब' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्याच्या वाढिदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याने साकारलेल्या खास भूमिकांविषयी.....