महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'सानिया'चा ट्रेलर लॉन्च: निर्मात्यांपासून ते कलाकारापर्यंत सर्वांनाच टेन्शन आले होते - परिणीती चोप्रा

By

Published : Mar 9, 2021, 1:56 PM IST

सोमवारी मुंबईत बहुप्रतीक्षित सायना चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या सिनेमात परिणीती चोप्रा बॅडमिंटनपटू सायना नेहवालची भूमिका साकारत आहे. लाँचिंगच्या वेळी ती म्हणाली, "प्रत्येक चित्रपटाचा स्वतःचा प्रवास असतो. दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाची स्क्रिप्ट मी वाचली होती. मला काही तरी वेगळे करायचे होते आणि त्यासाठी कठोर होमवर्कची गरज होती. त्यानंतर अमोल सरांनी मला कथाकथन केले आणि मी सज्ज झाले. निर्मात्यांपासून ते कलाकारापर्यंत सर्वांनाच टेन्शन आले होते. परंतु आम्हाला सायनाचा संपूर्ण पाठिंबा होता आणि आम्ही तिच्या आयुष्यात सहज प्रवेश करीत होतो. माझ्यावर बॅडमिंटन शिकण्याचा दबाव होता.'' सानिया चित्रपट २६ मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details