महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 24, 2019, 5:24 PM IST

ETV Bharat / videos

गझल सम्राट पंकज उदास यांचं मराठीत पदार्पण, कविता पौडवालसोबत गायलं भावगीत

मुंबई - भारतीय संगीत क्षेत्रात 'गझल' या गीतप्रकार अतीशय लोकप्रिय आहे. आजवर गझल गायक पंकज उदास यांच्या सुमधूर आवाजातील अनेक गझल ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. मात्र, आता मराठीमध्येही पंकज यांच्या आवाजाची जादु प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या कन्या कविता पौडवाल यांच्यासोबत त्यांनी एक भावगीत गायलं आहे. 'रंग धनुचा झुला' असे या भावगीताचे बोल आहेत. प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांचं संगीत या भावगीताला लाभलं आहे. तर, गीतकार मंदार चोळकर यांनी या गाण्याला शब्दबद्ध केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details