कमल हासन : नेहमी स्वतःचा शोध घेणारा प्रतिभावंत कलाकार - Kamal Haasan birth day
कमल हासन यांनी ६५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. वयाच्या ६ व्या वर्षी त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले होते. 'कलाथूर कन्नम्मा' या तामिळ चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हातून सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर त्यांनी तामिळ, हिंदी, तेलुगु आणि मल्याळम भाषेत तब्बल २०० चित्रपटातून काम केले आहे. ६५ व्या वर्षीही कमल हासन यांच्यातील उत्सह तरुणांना लाजवेल असाच आहे. सध्या त्यांचा इंडियन २ हा चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. लगेचच पुढील वर्षी जानेवारीत ते थलायवा इरुक्किन्द्रन या चित्रपटाचे काम सुरू करणार आहेत. कमल हासन यांचा आजचा वाढदिवस त्यांचे चाहते जोरदारपणे साजरा करणार आहेत. कमल यांच्या होमटाऊनमध्ये ७ ते ९ नोव्हेंबर या काळात त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीतील ६० वर्षाच्या कारकिर्दीचे सेलेब्रिशन पार पडणार आहे. ईटीव्ही भारतची सितारा टीम कमल हासन यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे.