इतक्या कमी वयात सिद्धार्थ शुक्लाचे जाणे धक्कादायक - सुनील पाल - सिध्दार्थ शुक्लाच्या मृत्यूने टीव्ही इंडस्ट्रीला धक्का
सिध्दार्थ शुक्लाच्या निधनाने अनेकांना धक्का बसलाय. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी त्याच्या आठवणी जागवताना दुःख व्यक्त केलंय. विनोदी कलाकार सुनिल पाल यानेही सिध्दार्थच्या निधनाच्या बातमीने हळहळ व्यक्त केली आहे. इतक्या कमी वयात तो सोडून गेला याबद्दल त्याने संवेदना बोलून दाखवली. त्यासोबतच या मृत्यूच्या कारणाचा तपास व्हावा अशीही मागणी त्याने केली.