'दहीहंडी'च्या उत्सवात रंग भरणारी स्पेशल बॉलिवूड गाणी... - श्रीकृष्ण जन्माष्टमी
आज सगळीकडे सध्या दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मात्र, बॉलिवूडच्या काही गाण्यांशिवाय दहीहंडीचा हा उत्सव अपूर्ण वाटतो. बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये दहीहंडीचा उत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यात आलाय. याशिवाय यातील गाण्यांनी तर, या उत्सवाची रंगतही वाढवलीये... दहीहंडी फोडणारा गोविंदा मोठ्या जल्लोषात हंडी फोडण्यासाठी जात असतो. त्यामुळे या गाण्यांनी गोविंदांचा उत्साह आणखी वाढवलाय..