HBD Big B : अमिताभ यांच्या चाहत्यांचा 'जलसा' बाहेर 'जल्लोष'!! - बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन
मुंबई - बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन उर्फ बिग बी आज ७९ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. ज्या वयात बहुतेक ज्येष्ठ व्यक्ती रिटायर्ड आयुष्य जगत असतात, पेन्शनवर दिवस काढत असतात त्यावयात बच्चन उत्साहाने, नव्या जोमाने काम करीत असतात. महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या असंख्य चाहत्यांसाठी अनोखा उत्सवच असतो. आज त्यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्य त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. अमिताभ यांनी बाहेर येऊन चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले त्यावेळी जलसा बाहेर जल्लोष पाहायला मिळाला.