महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

देव तारी त्याला कोण मारी..! पित्याने मुलाला सोडवले हत्तीणीच्या तावडीतून, पाहा थरारक व्हिडिओ - Shocking visual

By

Published : Apr 7, 2022, 6:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

कोझिकोडे ( केरळ ) - एका पित्याने आपल्या मुलाला हत्तीणीच्या तावडीतून सोडवल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती येते. ही घटना केरळच्या कोझीकोड मलोप्पूरमच्या सीमेवर घडली आहे. सीमेवरील गावातील एका मंदिराजवळ हत्तीण 'कोलक्कडन मिनी' ला बांधून ठेवण्यात आले होते. तिला चारा पित्याने आपल्याने चार वर्षीय मुलाच्या हातात चारा दिला. ते दोघे हत्तीणीला चारा देण्यासाठी पुढे गेले. त्यावेळी त्या हत्तीणीने पित्याला ढकलून मुलाला आपल्या सोंडेत गुंडाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लगेचच पित्याने लगेचच मुलाला हत्तीणीच्या सोंडेतून ओढत दूर फेकले. त्यानंतर दोघांनीही त्या ठिकाणाहून पळ ( father saving his small son ) काढला. सुदैवाने हत्तीणीला झाडाला बांधलेले असल्याने पुढील अनर्थ टळले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केले होते. आता व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल ( Father Saves Son Viral Video ) होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details