Praniti Shinde Criticism of Yogi : प्रणिती शिंदे यांनी जनतेची माफी मागावी - महंत अनिकेत शास्त्री - प्रणिती शिंदे यांची योगींवर टीका
नाशिक - देशातील पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपने कॉंग्रेसवर टीका केली. (Praniti Shinde Criticism of Yogi) याच पार्श्वभूमीवर सोलापूर येथील एका कार्यक्रमात कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका करताना थेट पंतप्रधान मोदी आणि योगी यांच्यावर हल्ला बोल केला. योगी यांची जागा मठात आहे. ते राजकारणात आले की वाटोळे होते असे म्हटले होते. यावर आता साधू महंतांकडून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, नाशिकमधून महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध करत शिंदे यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST