Aditya Thackeray Criticized To CM : बीएमसीच्या निवडणुका झाल्या की उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकेल- आदित्य ठाकरे - मशाल चिन्ह
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दिलेले 'शिवसेना' हे नाव लोकशाहीसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधत आदित्य ठाकरे म्हणाले की, 'हे कंत्राटदारांचे सरकार आहे. महाराष्ट्रात आता मुख्यमंत्र्यांचा अर्थ 'भ्रष्टाचार' असा झाला आहे'. मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विद्यमान सरकार आणि त्याचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 'हे सरकारही संविधान बदलणारं आहे, त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. हे सरकार कंत्राटदारांचे आहे'. तसेच शिवसेनेला दिलेले मशाल चिन्ह हा एकमेव प्रकाश आहे ,जो विश्वासघात आणि पाठीत वार, यामुळे झालेला अंधार दूर करेल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांचे सत्तेवर आलेले सरकार पाडण्याचे 'घाणेरडे काम' केल्याचे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच बीएमसीच्या निवडणुका झाल्या की, उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकेल, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.