Youth beaten in Mumbai : 'जय श्री राम' बोलला नाही म्हणून... तरुणाला मुंबईत परप्रांतियांकडून मारहाण, पाहा व्हिडिओ - तरुणाला मुंबईत परप्रांतियांकडून मारहाण
Published : Sep 30, 2023, 11:27 AM IST
मुंबईYouth beaten in Mumbai: मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरातील गोकुळनगर परिसरात परप्रांतीय तरुणांच्या चार जणांच्या टोळक्यानं एका मराठी मुलाला 'जय श्रीराम'चा नारा देण्यास सांगितलं. मात्र, त्यानं 'जय श्रीराम'चा नारा दिला नाही. म्हणून या चार तरुणांकडून त्या मराठी मुलास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या संपूर्ण मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 25 सप्टेंबरच्या रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय. सिद्धार्थ किसन अंगुरे असं मारहाण झालेल्या युवकाचं नाव आहे. याप्रकरणी आता त्या चार जणांविरोधात कुरार पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज तिवारी (वय 30) आणि रोशन उर्फ कबीर मिश्रा यांना अटक केली. अरुण पांडे आणि राजेश रिक्षाचालक हे दोन आरोपी सध्या फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.