Panchkula Viral Video: नदीत कारसह वाहून जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचविले, अंगावर शहारे आणणारी घटना पहा
चंदीगड :मान्सूनच्या मुसळधार पावसाने हरियाणातील पंचकुला येथे हाहाकार उडाला आहे. खडक मंगोलीजवळ दर्शनासाठी आलेली एक महिला चक्क कारसह नदीत वाहून गेली. ही महिला आपल्या आईसोबत मंदिरात दर्शनासाठी आली होती. महिलेने नदीकाठी गाडी उभी करताच अचनाक पाण्याचा प्रवाह वाढला. अशा स्थितीत महिला ही कारसह वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेला नदीतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. बऱ्याच प्रयत्नानंतर महिलेला नदीत अडकलेल्या कारमधून बाहेर काढण्यात यश आले. सध्या महिलेला पंचकुला सेक्टर-6 रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. क्रेनच्या सहाय्याने कार ही नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी अचानक वाढल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी जीवाची बाजी लावून महिलेचे प्राण वाचविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.