महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Maharashtra Monsoon Session आम्ही का शांत बसू, संजय शिरसाट आक्रमक - Maharashtra Monsoon Session

By

Published : Aug 24, 2022, 2:02 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व प्रसंग घडला. सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकमेकांवर धावून गेले. हे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने विधानभवनात Maharashtra Monsoon Session पाहिले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आक्रमक झाले होते. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी व विरोधक आमदार मोठ्या प्रमाणात एकमेकांना भिडले. आतापर्यंत विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करत होते. पण आज शिंदे गटाचे आमदार व विरोधक हे समोरा समोर आले. लवासा ओके, सिल्व्हर ओक Silver Oak ओके अशा घोषणा देण्यात आल्याने राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा आक्रमक NCP MLAs aggressive झाले. यासर्व विषयांवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याशी खास बातचीत केली आहे. 50 खोके एकदम ओके म्हणाऱ्यांचा जळफळाट झाला आहे. गाजर दाखवून अडीच वर्षे मातोश्रीला यांनी बदनाम केले असेही शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट Shinde group MLA Sanjay Shirsat म्हणाले. याव्यतिरीक्त अन्य मुद्द्यांवरही त्यांनी भावना व्यक्त केल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details