Dharavi Redevelopment : धारावी पुनर्विकासाबाबत स्थानिकांना काय वाटतं ? पाहा खास रिपोर्ट
मुंबईतील धारावी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळखली जाते. गौतम अदानी यांच्या कंपनीने आता या धारावीचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे. अदानी प्रॉपर्टीज ही जगातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्तीची रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी धारावीचा पुनर्विकास करणार आहे. अदानी समूहाच्या या कंपनीने धारावी झोपडपट्टीच्या पुनरुज्जीवनासाठी पुनर्विकास (Dharavi Redevelopment ) प्रकल्पाची बोली जिंकली आहे. औद्योगिक राजधानी मुंबईच्या मध्यभागी 600 एकर जागेवर पसरलेली ही झोपडपट्टी आता बदलणार आहे. मात्र, बदलाविषयी इथल्या स्थानिकांना काय वाटतं? त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत? हे जाणून घेतल आहे ईटीव्ही भारतने.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST