Wedding Ceremony in Cemetery : स्मशानभूमीत पार पडला आगळावेगळा विवाह सोहळा; Watch Video - स्मशानभूमीत लग्नसोहळा संपन्न
अहमदनगर(शिर्डी) -स्मशानभूमीत आगळावेगळा लग्नसोहळा पार पडला आहे. शिर्डीजवळील राहाता या गावच्या स्मशानभूमीत हा सोहळा पार पडला. म्हसनजोगी समाजाचे गायकवाड कुटुंब या स्मशानभूमीत वास्तव्यस आहे. स्मशानभूमीतील सर्व कामे हे कुटुंब करत आहे. त्यामुळे त्यांची मुलेही लहानाची मोठी याच स्मशानभूमीत झाली. आता या कुटुंबाने आपल्या मुलीचे लग्नही याच स्मशानभूमीत लावून दिले आहे. मुलीचा लग्नसोहळा स्मशानभूमीतच मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. गायकवाड व जयस्वाल कुटुंबाने वधू मयुरी व वर मनोज यांचा विवाह स्मशानभूमीत करण्याचे ठरवले आणि ते पारही पाडले. राहता येथील पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडांनी या मुलीचे कन्यादान करत त्यांना संसार उपयोगी भांडीही भेट दिली. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.