महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Telangana and Karnataka border कर्नाटकच्या धर्तीवर आमचा विकास करा अन्यथा आम्हाला तेलंगणा राज्यात जोडा - गांवकरी

By

Published : Dec 19, 2022, 12:39 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

तेलंगणा आणि कर्नाटक सीमेवरच्या Telangana and Karnataka border देगलूर तालुक्यातील मानूर इथल्या गावकऱ्यांनी तेलंगणाला जोडण्याची मागणी केली आहे. गावाच्या सरपंचानी थेट नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्र Letter to Collector of Nanded पाठवून ही विनंती केली आहे. धर्माबाद तालुक्यातील काही गावांनी या पूर्वी अशीच मागणी केली होती. त्या पाठोपाठ आता देगलूर तालुक्यातील मानूर इथल्या गावकऱ्यांनी ही मागणी केली आहे. तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमेपासून अवघे दीड किलोमीटर अंतर असलेल्या महाराष्ट्रातील या मानूर गावांत मूलभूत सुविधांचा अभाव आहे, त्यासोबतच गावाला जोडणारा रस्ता एकही चांगल्या स्वरूपाचा नाही, त्यामुळे मानूर इथल्या गावकऱ्यांनी तेलंगणा कर्नाटकच्या धर्तीवर आमचा विकास करा अन्यथा आम्हाला तेलंगणा राज्यात जोडा Add to Telangana State अशी मागणी केली आहे.border dispute
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details