Varun Sardesai criticized CM : मुख्यमंत्र्यांच्या सभेला रोजंदारीने जनतेची गर्दी.. वरून सरदेसाई यांची टीका - Varun Sardesai criticize CM
भूम ( उस्मानाबाद ) - आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात भूम येथील संवाद कार्यक्रमात युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी सरकारवर घणाघात केला. शिवसेना ही स्थापनेपासून नेते, आमदार, खासदारांच्या जीवावर नसून ती शिवसैनिकांच्या जीवावर आहे असे प्रतिपादन वरून सरदेसाई यांनी भूम येथील संवाद दौऱ्यात केले. यावेळी त्यांनी मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातील सभेचा उल्लेख केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे पैठणमध्ये लाखोंच्या जनसमुदायानी स्वागत केले तर नंतर पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने गद्दाराने सभेला लोकांची गर्दी जमवण्यासाठी लोकांना विविध आमिष दाखवून लोकांना पाचशे रुपयांनी रोजंदारी दिली. मला अभिमान आहे पैठणच्या नागरिकांचा की त्यांनी पन्नास खोके घेणाऱ्यांना एक दिवसाचा मोल पाचशे रुपये मागितला. याच्यातूनच आपण सर्वांनी समजून घ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी जनता कशी आहे. असे वरून सरदेसाई Varun Sardesai criticize CM म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST