landslide in Uttarkashi : गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली, रस्त्यावरुन जाणारा टेम्पो उलटला - उत्तरकाशीतील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग
डेहराडून : पाऊस आणि भूस्खलनामुळे येथील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. याच दरम्यान उत्तरकाशी जिल्ह्यात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्यामुळे डोंगरालगतच्या रस्त्यावरुन जाणारा टेम्पो पलटी झाला. पलटी झालेला टेम्पो खाली सरकत सरकत नदीच्या काठावर अडकला. दरम्यान कोणीतीच जीवितहानी झालेली नाही. दरम्यान पावसामुळे गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग मणेरी धरण आणि साईंजजवळ बंद आहे. आज पहाटे टेम्पो मणेरी धरणाजवळील डोंगरलगत असलेल्या रस्त्यावरुन जात होता. त्यावेळी डोंगरावरील दरड कोसळली. यातील दगड आणि मातीच्या ढिगाऱ्यामुळे टेम्पो पलटी होऊन रस्त्याखाली पडला. चालकाने प्रसंगावधान बाळगून वाहनातून खाली उतरुन त्याचा जीव वाचवला. झार-झार गडजवळ यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गही ठप्प झाला आहे. महामार्ग मोकळा करण्यासाठी घटनास्थळी जेसीबी तैनात करण्यात आला आहे.
पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे जिल्ह्यातील गंगोत्री आणि यमुनोत्री महामार्ग पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. मणेरी भाली धरणाजवळ ढिगाऱ्यांमुळे गंगोत्री महामार्ग बंद झाला आहे. - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल