Defense College building collapsed: पत्त्याप्रमाणे कोसळली डिफेन्स कॉलेजची इमारत, पहा व्हिडिओ - पार्किंग में कार डूबी
डेहरादून (उत्तराखंड): उत्तराखंडमधील जलप्रलयामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याचबरोबर कोसळणारी दरड आणि भूस्खलनामुळे लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. डेहराडूनच्या मालदेवता भागात डेहराडून डिफेन्स कॉलेजची इमारत पत्त्याप्रमाणे कोसळली आहे. पाऊस आणि पुरामुळे एक भव्य इमारत पत्त्याच्या घरासारखी कोसळली. हे दृश्य व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. मागील वर्षीही पावसाळ्यात मालदेवता परिसरात ढगफुटीची घटना घडली होती. तशीच परिस्थिती पुन्हा दिसून येत आहे. मालदेवता परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे आणि पुराचे पाणी तुंबले आहे. नेहमी पर्यटनाने गजबजणारी रिसॉर्ट्स देखील पाण्याखाली आहेत. हवामान खात्याने आज संपूर्ण उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. हा अंदाज खरा ठरत आहे. अशा स्थितीत पुढील २४ तास उत्तराखंडमधील जनतेसाठी आव्हानाचे असणार आहेत.