Flying Kiss Video : उदयनराजेंची जिप्सी राईड, चाहत्यांना दिला 'फ्लाईंग किस' - Udayanraje Bhosale Flying Kiss
सातारा :आपल्या हटके स्टाईल आणि डायलॉगमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचा जिप्सी राईड आणि फ्लाईंग किस देतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साताऱ्यातील रस्त्याने ते जिप्सीतून जात असताना आपल्या चाहत्यांना त्यांनी फ्लाईंग किस दिला आहे. लोकसभा सभागृहात राहुल गांधींनी दिलेल्या 'फ्लाईंग किस'वरून मोठा गदारोळ झाला होता. मात्र, उदयनराजे आपल्या चाहत्यांसाठी कधी काय करतील, याचा नेम नसतो. जानेवारी २०२२ मध्ये पोवई नाक्यावरील 'राजधानी सेल्फी पॉईंट'वर उदयनराजे चक्क 'लुंगी' घालून आले होते. फ्लाईंग किस, कॉलर उडवणे, कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या दिवशी तोंडाने पेढा भरवून शुभेच्छा देणे, गाड्यांवर स्टंट करणे, अशा हटके स्टाईलमुळे उदयनराजेंचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.