महाराष्ट्र

maharashtra

चोरांना पोलिसांकडून अटक

ETV Bharat / videos

Thieves Arrested in Bageshwar Dham Program: धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमात शिरले चोर; पोलिसांनी बेदम चोपले - Dhirendra Krishna Shastri program

By

Published : Mar 19, 2023, 10:24 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे): बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा दिव्य दर्शन दरबाराचा पहिला दिवस ठाण्यातील मीरा भाईंदर येथे आज रविवारी पार पडला. या कार्यक्रमात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. आज (रविवारी) या कार्यक्रमादरम्यान दोन चोरांना पोलिसांनी रंगेहात पकडून चोप दिला. यावेळी नागरिकांनीही आरोपी चोरांवर हात साफ केला. एकीकडे बाबा भक्तांच्या मनातले सांगण्याचा दावा करीत आहेत. मात्र, आपल्याच कार्यक्रमात शिरलेल्या चोरांना सुगावा त्यांना का लागत नाही, हे न उकलणारे कोडे आहे.

महिलेच्या मंगळसूत्राची चोरी: बाबांच्या दरबारात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. यामुळे संतापलेल्या महिलेने धीरेंद्र शास्त्री यांच्या चमत्कारावरील विश्वास संपल्याचे वक्यव्य केले. यामुळे बाबांच्या कार्यक्रमाला पहिल्याच दिवशी वादाची किनार लाभली. मंगळसूत्र चोरी झाल्यानंतर बाबा काहीतरी करतील, असे महिलेला वाटले होते. पण बाबांनी काहीच ने केल्याने महिला निराश झाली.  

चोरांचा सुळसुळाट: धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा दिव्य दर्शन दरबारात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. याला आळा घालताना पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. आतापर्यंत बाबांच्या कार्यक्रमातून वीस ते पंचवीस महिलांचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची माहिती उजेडात आली आहे. घटने प्रकरणी महिलांनी मिरा रोड पोलीस  ठाण्यात तक्रार दिली आहे.

हेही वाचा:Salman Khan Threat Case : अभिनेता सलमान खान धमकी प्रकरण; मुंबई पोलिसांनी वाढवली घराबाहेरील सुरक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details