Tree Plantation : वट पौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण, सुवासिनींचा वृक्ष संगोपनाचा संकल्प - वृक्ष संगोपनाचा संकल्प
अमरावती - पतीला दीर्घायुष्य लाभो या उद्देशाने परंपरेनुसार वट सावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. परंपरेनुसार वडाच्या झाडाच्या पूजेपर्यंतच मर्यादित न राहता वडासह विविध वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प घेऊन अमरावतीत शेकडो सुवासिनींनी आज जिल्हा परिषदेच्या कन्या शाळा परिसरात वृक्षारोपण केले. आम्ही लावलेल्या वृक्षांचे आम्ही कायम संवर्धन करू, असा संकल्पही यावेळी सुवासिनींनी केला आहे. भावी पिढीला नियमित ऑक्सीजन मिळत राहावा या उद्देशाने महत्त्वाची झाडे लावणे हा आमचा खरा उद्देश आहे. यानिमित्ताने आज आम्ही वडासह आंबा कडूनिंब अशा विविध वृक्षांच्या रोपट्यांची लागवड जिल्हा परिषद कन्या शाळा परिसरात करतो आहे असे या उपक्रमाच्या प्रमुख मोनिका उमक ' ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST