महाराष्ट्र

maharashtra

कारमधून नोटा फेकतानाचा व्हिडिओ

ETV Bharat / videos

Gurugram Car Viral Video : धावत्या कारमधून नोटा फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोघांना अटक - गुरुग्राम कारमधून नोटा फेकतानाचा व्हिडिओ

By

Published : Mar 15, 2023, 8:51 AM IST

नवी दिल्ली :  गुरुग्राम हरियाणा, हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक व्यक्ती त्याच्या चालत्या कारमधून चलनी नोटा फेकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची पडताळणी केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारमधील दोघा व्यक्तींना अटक केली आहे. सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या या व्हिडिओद्वारे पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. व्हिडिओत एक व्यक्ती गोल्फ कोर्स रोडवर कारमधून चलनी नोटा फेकून चित्रपटातील दृश्य तयार करण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. पोलिसांनी या प्रकरणी भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना मुख्य आरोपींची ओळख पटली आहे. डीएलएफ गुरुग्रामचे एसीपी विकास कौशिक या प्रकरणी म्हणाले की, जोरावर सिंग कलसी आणि गुरप्रीत सिंग यांना गुरुग्राममध्ये चालत्या कारमधून चलनी नोटा फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर अटक करण्यात आली आहे. इतर दोघे मोटारसायकलवरून हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. जोरावर सिंग कलसीकडून चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आम्ही कार परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले. 

ABOUT THE AUTHOR

...view details