leopard पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन, उसाच्या शेतात सापडली 3 पिल्लं - उसाच्या शेतात सापडली 3 पिल्लं
सांगली शिराळा तालुक्यातल्या टाकवे येथे एका उसाच्या शेतामध्ये 3 बिबट्यांची पिल्ले आढळून आली आहेत, leopard यानंतर वन विभागाकडून Forest department पिल्ले ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही पिल्ली त्यांच्या आई जवळ सुखरूप देखील पोहचली आहेत. शिराळा तालुक्यातल्या मौजे बांबवडे येथील शेतकरी सुनील राऊत यांच्या ऊसाची तोडणी सुरू असताना उसाच्या शेतामध्ये बिबट्यांची तीन पिल्ली आढळून आली आहेत. यामध्ये दोन नर आणि एक मादी अशा पिल्यांचा समावेश आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राणी मित्र अजितकुमार पाटील यांच्या माध्यमातून सदरच्या पिल्लांना चांदोलीच्या उद्यान परिसरातील नैसर्गिक अधिवासामध्ये सुस्थितीत सोडण्यात आले आहे. त्यानंतर कॅमेरा ट्रॅप देखील या ठिकाणी लावण्यात आला होता. त्यामध्ये बिबट्याच्या पील्लांची आईने येऊन आपल्या पिल्लांना घेऊन जंगलात गेल्याचे चित्रित झाले आहे. सदर बिबट्याची पिल्ले हे 30 ते 35 दिवसाची असल्याचे अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST