Har Ghar Tiranga : हजारो युवकांचा हातात तिरंगा घेऊन रॅलीत सहभाग; 'हर घर तिरंगा' अभियान
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा, यानिमित्ताने 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) असा नारा दिला. तेव्हा प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकावा, या उद्देशाने चांदूरबाजार येथील 'तिरंगा माझा' या ग्रुपच्या वतीने चांदूरबाजार ते अमरावती दरम्यान भव्य तिरंगा रॅली (Thousands of youth participated in the rally) काढण्यात आली. या तिरंगा रॅलीमध्ये ट्रक सजवून, त्यामध्ये भारत मातेला विराजमान करण्यात आले आहे. ह्या रॅलीत सहभागी हजारो युवकांनी हातात तिरंगा घेऊन संपूर्ण रॅली दरम्यान भारत मातेचा जयघोष केला. हजारो हातांमध्ये फडकणारा तिरंगा (tricolor in hand Har Ghar Tiranga campaign) हा; चांदूरबाजार ते अमरावती दरम्यान प्रत्येक गावात राष्ट्रभक्तीचा नवा उत्साह निर्माण करणारा होता. चांदूर बाजार शहरातून सकाळी नऊ वाजता तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. बोराळा ,शिराळा, पुस्दा, नांदुरा आणि कठोरा या गावांमध्ये या रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अमरावती शहरात कठोरा नाका, शेगाव नाका ,गाडगे नगर, पंचवटी येथून ही रॅली एरवीण चौक येथे पोहोचणार आहे. इर्विन चौक येथे या तिरंगा रॅलीचा समारोप होणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST