Kalicharan Maharaj : साईबाबांवर टीका करणारे नरकात जाणार - कालीचरण महाराज - Kalicharan Maharaj criticism Dhirendra Shastri
शिर्डी :कालिचरण महाराज यांनी शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे आज दर्शन घेतले. यावेळी साई दर्शनानंतर कालीचरण महाराज यांनी साईबाबांच्या समाधीवर भगव्या रंगाची शॉल चढवली. साई दर्शनानंतर मंदिरा बाहेर आल्यानंतर महाराज साईबाबांच्या गुरुस्थान मंदिर समोर नतमस्तक झाले. साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कालिचरण यांनी साईंबाबांनावर टिका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. जे साईबाबांवर टिका करतात ते नरकाच्या भागी जातील अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी बागेश्वरधाम सरकारवर केली आहे. शिर्डीच साईबाबा मंदिर हे बारा जोर्तिलिंग, शक्तीपिठा समान असून साईंच्या समाधीचे दर्शन घेतल्याने समाधान, उर्जा मिळत असल्याच कालिचरण महाराज यांनी म्हणटले आहे. बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांचा उद्धेश्य माहीत नाही, मात्र साईबाबांवर टिका केली तर आपली प्रसिद्धी होते. यामुळे हे लोक टिका करतात. त्यांच्या ह्या कृत्यामुळे सर्व साधू, संत बदनाम होत असल्याच देखील कालीचरण महाराज यावेळी म्हणाले आहे.