Gram Panchayat Election 2023 : सत्ताधारी भाजपाला जर मीडियाकडे जावं लागत असेल तर हे गृहमंत्र्यांचं अपयश - सुप्रिया सुळे - BJP Vs NCP
Published : Nov 5, 2023, 7:13 PM IST
|Updated : Nov 5, 2023, 9:00 PM IST
पुणे Gram Panchayat Election 2023 : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झालं. यात मुख्य लक्ष असलेली निवडणूक म्हणजे काटेगाव ग्रामपंचायत (Kategaon Grampanchayat) जिथे अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (sharad pawar) यांचे गाव आहे. त्याच ठिकाणी अजित पवार गट पैसे वाटत असून पैशाने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप तिथे भाजपाने केलाय. सत्तेत जरी एकत्र असले तरी काटेगाव ग्रामपंचायत मात्र भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी (BJP Vs NCP) यांच्यात लढत सुरू आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया (Supriya Sule Reaction) दिलेली आहे. निवडणुकीत पैसे वाटले याचं उत्तर गृहमंत्री यांनी दिलं पाहिजे. त्यांचं लक्षच नाहीये, अजित पवार गट पैसे वाटत असेल तर ते गृहमंत्र्यांनी पाहावं. गृहमंत्री राज्यात आहेत की, प्रचाराला दुसऱ्या राज्यात गेले हे पण कळत नाही. आम्ही न्याय आणि दाद कुणाला मागायची. सत्ताधारी भाजपला जर मीडियाकडे जावं लागत असेल तर हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.