Supriya Sule : अजित पवारांचा गट कोण चालवतंय? सुप्रिया सुळेंनी थेटच सांगितलं... - supriya sule criticized modi government
Published : Oct 8, 2023, 8:13 PM IST
सोलापूर : Supriya Sule :खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील अदृश्य शक्तींवर निशाणा साधलाय. त्या रविवारी सोलापूर दौऱ्यावर (Supriya Sule Solapur Tour) होत्या. या अदृश्य शक्तीनं राज्याचा खेळखंडोबा करून ठेवलाय, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सर्व आमदार अपात्र व्हावे यासाठी दिल्लीमधील अदृश्य शक्ती ताकद (Supriya Sule on Modi Government) लावत आहे. पण, आम्ही सर्व मराठी माणसं या अदृश्य शक्तीच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढू, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री निवड करत असताना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जावं लागतं हे सर्व अदृश्य शक्ती करत आहे, असंही त्या म्हणाल्या. याआधीही सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी फुटीवरुन केंद्रातील सरकारवर जोरदार टीका केली होती.