Old Pension Scheme Strike Pune : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संप; कर्मचारी म्हणाले... - जुनी पेन्शन योजना संप
पुणे : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभर शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांच्यावतीने संप पुकारण्यात आलेला आहे. पुण्यात देखील याचे परिणाम दिसू लागले असून जवळपास 95 टक्के कर्मचारी हे संपावर गेल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील सर्वच शासकीय निम शासकीय कर्मचारी तसेच शिक्षक शिक्षकेत्तर, जिल्हा परिषद, मुख्याध्यापक कंत्राटी कर्मचारी समन्वयक समितीच्या माध्यमातून आज सेंटर बिल्डिंग येथून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आजाराच्या संख्येने शासकीय तसेच निम शासकीय कर्मचारी उपस्थित होते. 2005 सालापासून सातत्याने मागणी करण्यात येत आहे की, आम्हाला जुनी पेन्शन योजना ही लागू करावी ही मागणी करण्यात येत आहे. मात्र, सातत्याने सरकारकडून फक्त आश्वासन दिले जातात. त्यामुळे आता जोपर्यंत लेखी स्वरुपात आम्हाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत हा संप अशाच पद्धतीने सुरू असणार आहे. तसेच कर्माचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे व्यवस्थेवर परिणाम जाणवायला सुरूवात झाली आहे.