महाराष्ट्र

maharashtra

राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल

ETV Bharat / videos

Rajaram Cooperative Sugar Factory Election Result: राजाराम सहकारी साखर कारखान्यावर कोणाचा डंका वाजणार? आज मतमोजणी - राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुक

By

Published : Apr 25, 2023, 10:35 AM IST

कोल्हापूर :आज श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक हे दोघे या निवडणूकीसाठी रिंगणात होते. त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू आहे. आज दुपारपर्यंत निकाल जाहीर होईल. यावर्षी 91.12 टक्के मतदान पार पडले आहे. मागील वर्षीपेक्षा 1 टक्क्याने मतदान वाढले आहे. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 29 आणि दुसऱ्या टप्प्यतात पुढील 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी होणार आहे. राजाराम साखर कारखान्याच्या संस्था गटातील एक व अन्य गटातील 20 अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत. आज दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. आज या मतमोजणी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. 

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details