VIDEO : शिवसैनिक आक्रमक, राणा दाम्पत्याच्या इमारतीत बॅरिकेट्स तोडून शिरले; जोरदार घोषणाबाजी - मातोश्री
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर पोहचून हनुमान चालीस वाचणार असल्याचे सांगितले होते. वेळ होऊनही ते मातोश्रीवर न पोहोचल्याने शिवसैनिक त्यांच्या इमारतीत घुसले. तसेच त्यांना बाहेर येण्याचे आवाहन केले आहे. अनेक ठिकाणांहून शिवसैनिक आले आहेत. यावेळी शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. तसेच जोपर्यंत राणा घराबाहेर येत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नसल्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. तसेच हनुमान चालीसा वाचल्यानंतर त्यांना महाप्रसाद द्यायचा असल्याचेही शिवसैनिकांनी म्हटले आहे. शिवसैनिक आक्रमक झाले असून पोलिसांचा मोठा ताफा तैनात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST