मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागपूर - शिवसेना पक्षातील नाराजीने राज्यातील राजकारणात तापले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत शिवसैनिकांना भावनिक आव्हान केले. याच भावनिक आवाहनाला नागपुरातील शिवसैनिकांनी व्हरायटी चौकात एकत्रित येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत आणि गद्दारांना माफ करणार नाही, असे म्हणत आंदोलन केले. आम्ही सगळे शिवसैनिक पक्षप्रमुखांच्या सोबत आहोत आणि सोबत राहणार, असा विश्वास या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. यावेळी महिला पदाधिकरीही मोठ्या संख्यने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST