वणी तालुक्यातील पूरग्रस्तांना शिवसेनेची मदत; किराणा, शालेय साहित्य, चादर आदींचे केले वितरण - वणी तालुका पूरग्रस्त
यवतमाळ - वणी तालुक्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना सरसावली आहे. पूर बाधित ग्रामस्थांना शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी संसारोपयोगी साहित्य, किराणा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, चादर, ब्लॅंकेट आदींचे वितरण केले. शिवाय गावात पाणी साचून असल्याने साथ रोग पसरू नये म्हणून शिवसेनेच्या वतीने फवारणी देखील करण्यात आली. वर्धा नदीला आलेल्या पुराचा वणीतील अनेक गावांना फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली व हजारो लोकांना पशुधनासह स्थलांतरित व्हावे लागले. शेती उद्ध्वस्त झाल्याने मजुरीचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्यात शासनाकडून अद्याप मदत न झाल्याने शिवसेनेने पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचे मदतकार्य सुरू केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST